• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला अचानक आग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 4, 2024
in गुन्हे
0
रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला अचानक आग

विशाखापट्टणम येथील घटना ; तीन बोगी जळून खाक

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था ) दि. ०४ ऑगस्ट २०२४ |  विशाखापट्टणम येथील रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला रविवारी अचानक आग लागली. या आगीत ट्रेनच्या तीन बोगी जळून खाक झाल्या. हा अपघात कोरबा एक्सप्रेस (१८५१७) मध्ये झाला असून घटनेवेळी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभी होती. या अपघातात तीन एसी डबे जळाले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, B7 बोगीच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. यामुळे बी7 बोगी पूर्णपणे जळून खाकझाली. यानंतर ही आग B6 आणि M1 एसी बोगींमध्ये पसरली. आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही.

रेल्वेच्या बोगींना लागलेल्या आगीच्या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो धक्कादायक आहे. एसी डब्यांमधून उंच ज्वाळा उठत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच आजूबाजूला धुराचे लोट पसरले आहेत. आग विझवण्यात रेल्वे कर्मचारी व्यस्त आहेत. त्याचवेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Tags: Korba Express
Next Post
भुसावळ येथील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

भुसावळ येथील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add