• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर मध्ये प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 31, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
रावेर मध्ये  प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

अनिल चौधरींनी अधिकाऱ्यांनाही बसविले खड्ड्यात, लवकर काम सुरू करण्याचे दिले आश्वासन

रावेर | दि. ३१ जुलै २०२४ | तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले.

रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. पिंप्री मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून १-१ फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांना सांगितले होते.

अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागली दखल..
आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अधिकारी त्याठिकाणी पोहचले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी पाण्यात बसवले. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणे करून दिले असता लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे काम मार्गी लागल्यास केऱ्हाळा, अहिरवाडी, खानापूर, पिंप्री, मंगरूळ गावातील नागरिकांना फायदा होणार आहे.

आंदोलनात यांचा होता सहभाग..
पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, उपसरपंच राकेश भंगाळे, संतोष बारी, रावेर युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वासिम शेख सचिन महाजन, योगेश पाटील, कृष्णा महाजन, राहुल महाजन, माजी उपसरपंच विकास पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Tags: prahar janshaktiRaver
Next Post
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचालीचा मार्ग मोकळा

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचालीचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group