• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, राजकीय, सामाजिक
0
आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

रावेर;- रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी धरण यंदा देखील पूर्ण भरले आहे. वरुण राजाची कृपा राहिल्याने सुकी नदीला चांगले पाणी आले आल्याने सुकी धरण भरले. परिसरातील शेतकरी बांधव आनंदित झाले असून पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. धरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी आणि परिसरातील नागरिकांतर्फे जलपूजन करण्यात आले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Video-2024-07-30-at-17.51.48.mp4

आज मंगळवार दि.३० जुलै रोजी पाल परिसरातील गारबर्डी धरण येथे जलपूजन सोहळा प्रहार जनशक्ती पक्ष आणि अनिल चौधरी मित्र परिवार वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रावेर-यावल तालुक्यावर यंदा वरुणराजाची कृपा राहिल्याने पाऊसपाणी चांगला आहे. यंदा धरण पूर्ण भरले असून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत. कालच धरण पूर्ण भरल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गारबर्डी धरण यावल-रावेर तालुक्यासाठी वरदान असून शेतकरी बांधव व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निसर्गाची कृपा आपल्यावर अशीच रहावी, अशी प्रार्थना अनिल चौधरी यांनी केली.

गारबर्डी धरणावर जलपूजन आणि सुकी माईचे आभार मानताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, रावेरचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेवक करीम मण्यार, प्रहार शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, रावेरचे अमोल महाजन, विलास पांडे, सावखेडा सरपंच रवी महाजन, विवरे उपसरपंच विकास पाटील, जुमा तडवी, पालचे दिलीप बंजारा, सरपंच नंदकिशोर महाजन, राकेश भंगाळे, धीरज चौधरी, रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, पिंपरकुंड सरपंच दिलीप बारेला, अतुल तडवी, मनीष चौधरी व समस्त शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: anil chaaudhariprahar janshaktiRaver
Next Post
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव ; जलतरणात पदक जिंकणारा खेळाडू पॉझिटिव्ह

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव ; जलतरणात पदक जिंकणारा खेळाडू पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add