• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किशोर सोनवणे खून प्रकरणातील दोघांना ठोकल्या बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
किशोर सोनवणे खून प्रकरणातील दोघांना ठोकल्या बेड्या

सावंतवाडी ते मालवण पाठलाग करून पोलिसांनी केली अटक

जळगाव | दि. २८ जुलै २०२४ | शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे झालेल्या किशोर सोनावणे खून प्रकरणातील फरार दोन संशयित आरोपींना दोन महिन्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळून अटक करण्यात आली आहे. सावंतवाडी ते मालवण असा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे दि. २३ मे २०२४ रोजी किशोर सोनवणे याची संशयित ११ आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या घटनेतील दोन संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (कोळी ) (वय ३०, रा. श्रीराम नगर,जळगाव) हे फरार होते. सदर गुन्हा शनिपेठ पोलीस स्टेशनला दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरूच होता.

दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी फरार आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके विविध गुन्ह्यांमधील फरार संशयीतांचे शोध घेऊन त्यांना अटक करत आहे. त्यातच हॉटेल भानू येथे झालेल्या खून प्रकरणात संशयित आरोपी निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे (कोळी ) यांची माहिती पोलिसांनी काढली. दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यांमध्ये आजगाव येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. येथील पोलिसांनी आजगाव येथे जाऊन संशयित आरोपींची माहिती घेतली. दरम्यान पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच संशयित निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे (कोळी )हे मालवणच्या दिशेने ते दोघे क्रेटा गाडीने पळून जाण्याचा प्रयत्नात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मालवणच्या हद्दीत ताब्यात घेतले. यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ला माहिती दिली. दोन्ही संशयित आरोपी हे एलसीबी च्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना जळगावला आणण्यात येत असून आज रविवारी दुपारपर्यंत येतील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सिंधुदुर्ग येथील पोलिसांच्या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Tags: CrimeJalgaonmurder
Next Post
वायरी चोरणाऱ्या चौघांना अटक ; रामानंद नगर पोलिसांची कारवाई

वायरी चोरणाऱ्या चौघांना अटक ; रामानंद नगर पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add