जळगाव | दि.१७ जुलै २०२४ | शिरसोली रस्त्यावर रविवारी भरधाव कार झाडावर धडकल्याने भिषण अपघात झाला होता. यात एकाचा मृत्यू होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींचे वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेले योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५३) यांची उपचार सुरू असताना बुधवारी दि. १७ रोजी सायकांळी ६.३० वाजता प्राणज्योत मालवली.
योगेश रेंभोटकर हे दैनिक देशदूत मध्ये जाहिरात विभागातील कर्मचारी होते. त्यांची अंतयात्रा गुरूवार दि. १८ रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरून नेरीनाका वैकुंठधाम येथे निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे. ते जैन इरीगेशनमधील प्रवीण रेंभोटकर यांचे बंधू होत.