जळगाव | दि.१३ जुलै २०२४ | महाविकास आघाडी तर्फे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान प्रशासनाकडून लेखी उत्तर देत उर्वरित मागण्यांसाठी राज्यस्तरावर बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिल्याने शुक्रवारी धरणे आंदोलन थांबवत असल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून महाविकास आघाडी व शेतकरी संघटना तसेच समविचारी संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू होते. शुक्रवारी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाते यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, दुग्ध उपसंचालक, जिल्हाधिकारी कार्यालय चिटणीस आदी अधिकाऱ्यांनी मागण्या बाबत लेखी पत्र देवून माजी खासदार उन्मेश पाटील यांना धरणे आंदोलन मागे घ्यावी. अशी विनंती केली उपस्थीत कार्यकर्ते पदाधिकारी व नेते शेतकरी बांधवांनी एकदिलाने धरणे आंदोलन मागे घेतले.
याप्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, ज्येष्ठ नेते गजानन मालपुरे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, महापौर जयश्री महाजन, नगरसेवक सुनिल महाजन, जया तिवारी, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, जामनेर शहराध्यक्ष दीपक राजपूत, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाप्रमूख महेंद्र पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, अशोक सानप, देवचंद साबळे, महेंद्र जैस्वाल, शैलेंद्र सातपुते, दीपक सोनवणे, राहुल भालेराव, प्रा.विशाल पवार, गोकुळ चव्हाण, इब्राहीम तडवी, सुनील माळी, वाय. एस. महाजन, प्रमोद पाटील, सोपान पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारूप विधानसभेतून मंत्र्यांचे वाभाडे..
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रारूप विधानसभा तयार करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विद्यमान मंत्र्यांचे वाभाडे काढले. या प्रारूप विधानसभेला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खासदार उन्मेष पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या रूपात ही प्रारूप विधानसभा चालवली. महाविकास आघाडीच्या वतीने नाकर्त्या राज्य सरकारच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.