• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शब्द व स्वरांनी रसिक चिंब भिजले ; परिवर्तनच्यावतीने ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 9, 2024
in मनोरंजन
0
शब्द व स्वरांनी रसिक चिंब भिजले ; परिवर्तनच्यावतीने ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ साजरा

जळगाव | दि. ०९ जुलै २०२४ | पावसाच्या कविता व गाण्यांनी संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनच्यावतीने ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले होते. कालिदासाच्या काव्याने जगाला मोहिनी घातली असून आषाढ महिन्यातला पहिला दिवस महाकवी कालिदास दिन साजरा होत असतो.

परिवर्तनच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून या दिवशी कवितेचा कार्यक्रम होत असतो. यंदा “पावसाच्या कविता व गाण्यांचा कार्यक्रम” घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात तुकोबांच्या ‘भेटी लागी जिवा’ या अभंगांने करण्यात आली. मेघदूतातील काही ओळी वरुण नेवे यांनी सादर केल्या. बहिणाबाई, ना.धों. महानोर, बालकवी, ग्रेस, सौमित्र, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, जितेंद्र कुवर या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या.

हिंदी व मराठी सिनेमातील पावसाची गाजलेली निवडक गाणी रजनी पवार, वरुण नेवे यांनी आपल्या अप्रतिम सुरात मैफिलीत रंग भरले. विकास वाघ यांनी ‘पड रे पाण्या पड, कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही…’ सादर केले. पंकज पाटील, साक्षी माळी, हर्षदा पाटील यांनी प्रभावीपणे कवितांचे सादरीकण करत दाद मिळवली. निवेदन हर्षल पाटील यांनी केले.

कार्यक्रमाची संकल्पना मोना निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी, निर्मिती प्रमुख डॉ किशोर पवार व प्रा. मनोज पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नंदू अडवाणी, अनिश शहा, डॉ. रेखा महाजन, सुनील पाटील, अमर कुकरेजा यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब गणपती नगर यांचे सहकार्य लाभले.

Next Post
महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन ; दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध

महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन ; दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add