जळगाव | दि.०९ जुलै २०२४ | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना विविध विषयांना अनुसरून युवासेनेच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे, दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये संपूर्ण विषयात प्रथम वर्ष अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश दिला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यापीठातील जे काही खेळाडू विविध खेळात प्राविण्य पटकावून ते देशात आपले विद्यापीठाचे नेतृत्व करतात अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. जे काही खेळाडू इतर राज्यात खेळायला जातात अशा खेळाडूंना रेल्वेत आरक्षण निश्चित करून मिळवण्यात यावे. खेळाडूंना योग्य मानधन देण्यात यावे, खेळाडूंच्या गुणवत्तेच्या दृष्टीने कार्य करण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.
दरम्यान कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी संपूर्ण मागण्यांचा सकारात्मक विचार करून, मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, नंदुरबार जिल्हा युवासेना विस्तारक तथा उपजिल्हायुवाधिकारी कुणाल कानकाटे, जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, युवासेना महानगर युवाधिकारी मनोज जाधव, तालुका युवाधिकारी गणेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रितम शिंदे आदी उपस्थित होते.