• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न ; नविन कार्यकारिणीची घोषणा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न ; नविन कार्यकारिणीची घोषणा

जळगाव | दि.०८ जुलै २०२४ | ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांची प्रमूख उपस्थिती होती.

व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या. मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले.

उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅच पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले. २०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा उषा जैन यांनी केली. कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सी.सी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. इनर व्हिल क्लबचा लोगो पदाधिकारी व पाहुण्यांना वितरित करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा.. – निशा जैन
आपण समाजाकडून भरपूर घेत असतो ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नाविन्यता व कल्पकतेतून इनर व्हिल क्लबच्या उद्दिष्ट्यांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी विद्यमान अध्यक्षा उषा जैन यांच्यासह महिलांच्या टिमवर्कच्या माध्यमातून यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, अशा शुभेच्छा प्रमुख अतिथी म्हणून अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी दिल्यात.


Next Post
अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

अनुभूती निवासी स्कूल मध्ये 'फेशर्स डे' साजरा

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group