जळगाव | दि.०५ जुलै २०२४ | सर्वत्र सर्रास वृक्षांची वृक्षांची कत्तल होत असल्याने निसर्गाची मोठी हानी होत आहे. दरम्यान मुस्लिम बांधवांच्या येणाऱ्या मोहरम सणा निमित्त आज शुक्रवारी शजरकारी मुहीम (वृक्षारोपण मोहीम) ची सुरुवात नियाज अली नगरातील सुन्नी ईदगाह मैदान येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै.अयाज अली नियाज अली यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाविषयी बोलताना सर्वांनी निदान कमीत कमी एक तरी झाड लावून त्याला जगवावे. शुद्ध हवा ही कुठेही विकत मिळत नसून याच वृक्षांमुळे ती आपल्याला मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी २० लिंबाची झाडं लावण्यात आली असून पुढे मोहीम राबवून विविध भागांत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .महेश्वर रेड्डी, सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै.अयाज अली नियाज अली, हाजी इकबाल वजीर, हाजी मुक्तार शहा, शेख जमील, हाजी रफिक कुरेशी, हाजी शेख सलीमुद्दिन, हाजी अजमल शाह, शफी ठेकेदार, सय्यद उमर, इलियास नुरी, अफजल मणियार, छोटू पटेल, शेख विकार, शेख शोएब जमील, हुसेन खान, इरफान पिंजारी, फैजान कादरी इत्यादी उपस्थित होते.