जळगाव | दि.०१ जुलै २०२४ | काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या खंडीत वीज पुरवठ्याच्या समस्येला त्रासलेले जळगाव ग्रामीणमधील शेतकरी आज सोमवारी महावितरणवर चालून गेले. संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून महावितरणच्या कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व केले.
शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासह नादुरूस्त रोहित्र आणि जीर्ण वीजवाहक तार २४ तासाच्या आता बदलाव्या, गावठाण परिसरात २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, नवीन वस्त्यांमध्ये वीजेचे खांब बसवून त्याठिकाणच्या वीजपुरवठा सुरळीत करावा, आदी मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांना माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता वेळेवर न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसोबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी शरदचंद्र पवार य़ुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील, वाल्मीक पाटील, पंकज महाजन, बापू परदेशी, विनायक चव्हाण, साधना पाटील, एश्वर्या पाटील, पांडुरंग पाटील, डाॅ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, अर्जून पवार, संजय पाटील, पुरूषोत्तम चौधरी, अनिल पाटील, दिलीप चव्हाण, अशोक पाटील, हेमंत पाटील, संजय चव्हाण, अशोक सोनवणे, नीलेश पाटील, संतोष नेटके, गोलू पवार, संदीप कोळी, राजू कोलते, बरकत अली, संदीप ठोंबरे, संजय जाधव, शिवाजी पाटील, चेतन कोळी, भैया पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पाटील, धवल पाटील आदी उपस्थित होते.