जळगाव | दि.२५ जुन २०२४ | “राम कृष्ण हरी“ पंढरपूर वारी चे नाव उच्चारताच मनामध्ये हर्ष व चेहऱ्यावर अल्लौकिक तेज आल्याशिवाय राहत नाही, आषाढी पंढरपूर पायी वारी उभा महाराष्ट्र वर्षानुवर्षे करत आहे, हीच संकल्पना लक्षात घेऊन जळगावकर साइकिलिस्ट तर्फे आषाढी पंढरपूर सायकल वारी काढण्यात येत आहे.
सायकल वारीचे हे दुसरे वर्ष असून यंदा ०४ जुलै ते ०७ जुलै दरम्यान जळगाव ते पंढरपूर सायकल वारी आयोजीत करण्यात आली आहे. त्या निमीत्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या हस्ते आज मंगळवारी सायकल वारी टी शर्ट चे अनावरण करण्यात आले.
राम घोरपडे, निलेश चौधरी, रूपेश महाजन, सखाराम ठाकरे व इतर सायकलिस्ट परिवार आषाढ महिना पूर्वी साधारण ४० ते ४५ दिवस आधी वारीचे नियोजन सुरु करतात. नियोजनात सुरवातीला किती साइकिलिस्ट मित्र सहभाग घेत आहेत. वारीत राहण्याचे, जेवणाचे व परतीच्या प्रवासाचे संपूर्ण सुष्म नियोजन केले जाते.
सायकल वारी ही जळगाव पासून सुरू होऊन पहिल्या दिवशी १५० किमी अंतर पार करुन संभाजी नगर येथे मुक्कामी असणार आहेत. वारीच्या दुसऱ्या दिवशी संभाजीनगर ते मांजरसुंबा १५० किमी चे अंतर पार करणार आहेत, तिसऱ्या दिवशी साधारण १८० कि.मी. पंढरपूर पर्यंत असे एकुण ४८० कि.मी. सायकल प्रवास करुन अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर निवासी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत.
ह्या वर्षी पूर्ण महाराष्टातील वारीला येणारे सायकलपटू ७ जुलै रोजी पंढरपुरात सायकल रिंगण करणार आहेत, त्यात जळगाव सायकलिस्ट पण सहभागी होणार आहेत. सायकल वारी मध्ये या वर्षी जळगाव जिल्ह्यातील २२ ते २५ सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. विशेषता माजी जिल्हानियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्रा. दिपक दलाल, राम घोरपडे, सखाराम ठाकरे, सुरजकुमार नेमाडे, राजू सोनवणे व विलास बोंडे तसेच उद्योजक निलेश चौधरी, अनिकेत पवार, रूपेश महाजन, स्वप्नील मराठे, विनोद पाटील, डॉ. निलकंठ पाटील, दिपक महाजन, दर्शन महाजन, रितेश पाटील, संतोष बारी, उदय पाटील, डॉ. वैभव पाटील, समिर चौधरी, ज्ञानेशवर धांडे, व इतर सायकलिस्ट सहभागी होत आहेत.