जळगाव | दि.२२ जुन २०२४ | भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक प्रभारीपदी ललितकुमार रमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल आज शनिवार दिनांक २२ जून रोजी गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी पाडळसा येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे तालुका यावल या संस्थेची सभा नुकतीच कुटुंबनायक रमेश दादा विठू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात प्रभारी कुटुंबनायकपदी ललितकुमार रमेश पाटील ह्यांची निवड झाली आहे.
दरम्यान डॉ. केतकीताई पाटील ह्या अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी पाडळसा येथे गेल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत चिमुकल्या किवा व सारा देखील होत्या. यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थित रमेशदादा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली.