जळगाव | दि.१७ जुन २०२४ | गोदावरी संगीत महाविद्यालयात ’गित गोविंद’ या सुरेल मैफिलीच्या दे रे कान्हा’, ’आज गोकुळात रंग, अरे मन मोहना’ या सारख्या गीतांनी रसिक चिंब भिजले. गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मोनियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने मैफील बहरत गेली.
गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत मैफीलीचे उदघाटन दिपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.सुशिल अत्रे, विजय कृष्णकुमार (मुंबई), श्रीमती गोदावरी पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, प्रविण महाजन, देवेंद्र गुरव, सुशिल महाजन, केंद्र व्यवस्थापक राजु पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार लिखीत महाराज कृष्णकुमार : व्यक्तीत्व और कृतित्व या पुस्तकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळस महाराज कृष्णकुमार यांचे सुपुत्र विजय कृष्णकुमार (मुंबई) यांची उपस्थिती लाभली. यांनतर कथक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुराली हे बहारदार नृत्य सादर केल तर, निरतत थुंग विरजु महाराज यांची बंदीश सादर केली. ’घागर घेवून निघाली’ ही गवळण तर किती सांगू मी सांगु कुणाला’ यांनतर नंद किशोरा, झुलतो बाई रास झुला, गोकुळात रंग इ गिते अनुक्रमे राजस्वी चव्हाण, नमस्वी पाटील, आरुषी अदनाने पूर्वी जगताप,रिया वर्मा, कनकश्री अय्यंगार, समृध्दी जोशी, गित साळवे व मित साळवे या चिमुकलींनी आपल्या मधुर आवाजात सादर केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या पद्मजा नेवे यांनी केले. सुत्रसंचालन वैष्णवी जोशी व यशश्री ठाकुर यांनी तर आभार प्रदर्शन भुषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील, भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले.