• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 7, 2024
in जळगाव जिल्हा
0
पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

जळगाव, दि. ०७ – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती बाबतचे ज्ञान घेण्यासाठी एका विशेष ट्रेनिंग जैन हिल्सच्या गुरुकूल सुरु आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. बी. डी. जडे, राजेश आगीवाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, अशोक चौधरी, जैन इरिगेशनचे अजय काळे, मनोहर बागुल, संजय सोन्नजे, रोहित पाटील, हर्षल कुळकर्णी उपस्थित होते.

जैन फूडपार्क मध्येसुद्धा पर्यावरण दिवस साजरा केला गेला. जैन व्हॅलीमध्ये टि.यू.व्ही.नॉर्डचे ऑडिटर गिरीश ठुसे यांच्या प्रमूख उपस्थित वृक्षारोपण झाले. यावेळी सुनील गुप्ता, बालाजी हाके, वाय. जे. पाटील, जी. आर. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. फायर सेफ्टी विभागाचे कैलास सैदांणे व सहकारी पंकज लोहार, निखिल भोळे, मनोज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.

जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो – हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्यांना लक्ष्य करून. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण’ ही आहे. वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार पृथ्वीवरील ४० टक्के जमीन खराब झाली असून त्याचा थेट फटका जगातील निम्म्या लोकसंख्येला बसत आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे त्यावर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो,” यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सहकाऱ्यांनी घेतला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण..
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कार्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी पोलीस उप अधिक्षक (गृह) मनोज पवार, राखीव पोलीस निरिक्षक संतोष सोनवणे, ट्राॅफीक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास इंगोले, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, राजेश वाघ, कलीम काझी, पोलीस प्रशिक्षक सोपान पाटील, संतोष सुरवाडे, आशिष चौधरी, रोहिणी विष्णू थोरात, राऊंड फाॅरेस्ट ऑफिसर सोशल फाॅरेस्ट्री, जैन इरिगेशन सिस्टिम लि चे राजेंद्र राणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मदन लाठी, क्लीन ग्रुप जळगावचे विशाल पाटील, रवी नेटके, डॉ. महेंद्र काबरा, आदित्य तोतला आदी उपस्थित होते.


Next Post
शिवचरित्र साहित्य संमेलन जळगावात होणे हि अभिमानाची बाब.. – डॉ केतकी पाटील

शिवचरित्र साहित्य संमेलन जळगावात होणे हि अभिमानाची बाब.. - डॉ केतकी पाटील

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group