• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

थोर पाणी पाड्यातील मृतांच्या नातेवाईकांचे डॉ. केतकी पाटील यांच्याद्वारे सांत्वन

जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीद्वारे जोपासली माणुसकी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
थोर पाणी पाड्यातील मृतांच्या नातेवाईकांचे डॉ. केतकी पाटील यांच्याद्वारे सांत्वन

जळगाव, दि.०३ जुन २०२४ | यावल तालुक्यातील थोर पाणी या आदिवासी पाड्यावर मागील आठवड्यात झालेल्या वादळात एका पावरा कुटुंबातील चार जणांचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आज घटनास्थळी गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, जळगाव जिल्हा पूर्व, पश्चिम आणि जळगाव महानगर महिला मोर्चा समन्वयिका डॉ. केतकी पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करून माणुसकी जोपासली.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या अति दुर्गम भागातील थोर पाणी या आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद अशी आहे. या दुर्दैवी घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुलाब पावरा, सोनूबाई नानसिंग पावरा, रतिलाल नानसिंग पावरा आणि बालीबाई नानसिंग पावरा या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबातील एक मुलगा शांतीलाल मानसिंग पावरा हा सुदैवाने बचावला.

या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन डॉ. केतकी पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरत महाजन, राहुल पाटील, सुरेश हट्टा पावरा, हट्टा रजन पावरा, बाला गुला पावरा, चिमा नांदला पावरा यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून पाड्यावरील प्रत्येकाला आरोग्य शिबिरांद्वारे आरोग्य सेवा पोहचविण्याचा मानस डॉ केतकी यांनी बोलून दाखविला.

Next Post
पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add