• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ ; जळगाव, रावेरचा अचूक निकालाचे दिवसभर महाकव्हरेज !

इंडिया आपतक, द क्लिअर न्यूजचा संयुक्त उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 1, 2024
in राजकीय
0
‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ ; जळगाव, रावेरचा अचूक निकालाचे दिवसभर महाकव्हरेज !

जळगाव, दि.०१ – लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, दि. ४ जून २०२४ ला जाहीर होत आहे. हा निकाल देशातील सत्तेची पुनर्स्थापना किंवा परिवर्तन या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघातील निकालाविषयी मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची संभावित राजकिय गणिते लोकसभा निवडणूक निकालावरून दिसतील. देशाचा लोकसभेचा आणि महाराष्ट्र विधानसभेचा संभावित कौल हा मतदारांना जाणून घ्यायचा आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव मधील प्रसार व जाहिरात माध्यम क्षेत्रातील सर्वाधिक अनुभवी मंडळी ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या ११ तासांच्या लाईव्ह कार्यक्रमातून करणार आहे. या कार्यक्रमाची संरचना खालील प्रमाणे आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ‘इंडिया आपतक’ केबल चॅनेलचे संपादक आनंद शर्मा, ‘क्लिअर न्यूज’ पोर्टलचे संपादक विजय वाघमारे हे सकाळी ८ ते सायंकाळी ७ अशा ११ तासांचा ‘चुनावी फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालित करतील. दिवसभरात १० टप्प्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत निकालाचे विश्लेषण होणार आहे. तर या कार्यक्रमाचे इव्हेन्ट मॅनेजमेंट मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परितोष सुशील नवाल व सहकारी हे करणार आहेत.

हा कार्यक्रम रेड टीव्ही केबलवर चॅनल नंबर ५२ आणि ७२ वर बघता येणार आहे. तसेच इंडिया आपतक न्यूजच्या युट्युब चॅनल (https://www.youtube.com/channel/UCLcY4UR9NfaT_wDgj4CF38w/live) आणि फेसबुक पेज (https://www.facebook.com/profile.php?id=100064272390190&mibextid=ZbWKwL) तसेच द क्लिअर न्यूजच्या देखील युट्युब चॅनेल (https://youtube.com/@theclearnews5119?si=JF4U_vIh53CRg5vK) व फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/share/bXKDy9yfTuDThqox/?mibextid=LQQJ4d) लाईव्ह बघता येणार आहे.

जळगाव व रावेर मतदार संघातील निकालाचे विश्लेषण तालुका व मतदार संघनिहाय बारकाव्याने केले जाणार आहे. या शिवाय धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील इतर चार मतदार संघासाठी आढावा असेल. जळगाव जिल्ह्यातील मतदारांसाठी सर्वात उत्सुकतेचा निकाल हा उत्तर मध्य मुंबई असेल. या मतदार संघात भाजपकडून खान्देशपुत्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम हे रिंगणात आहेत. तसेच राज्यभरातील मतदारांसाठी सर्वाधिक उत्सुकतेची लढत हि बारामती मतदार संघात आहे. तेथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची लढत आहे. याशिवाय नागपूर मतदार संघात नितीन गडकरी, बीड मतदार संघात पंकजा मुंडे यांच्याही निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. जळगाव, रावेर मतदार संघातील लढतीसह वरील सर्व मतदार संघातील लढतींविषयी अत्यंत बारकाव्याने निकालाचे विश्लेशन करण्याची यंत्रणा ‘चुनाव का फैसला … कोण जिंकला कोण हरला ?’ या कार्यक्रमात करण्यात आली आहे.

जळगावातील मान्यवर पत्रकार हे निकालाचे गणित उलगडून सांगणार आहेत. तसेच या कार्यक्रमात राजकिय, सामाजिक, व्यापार, उद्योग, कला, सांस्कृतिक अशा क्षेत्रातीलही जवळपास १५० हुन अधिक मान्यवर आणि तालुका स्तरावरील २० वर पत्रकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा भरातील कोणताही मतदार निवडणूक निकाल आणि निवडणूक प्रक्रिये विषयी व्हाट्सअपच्या माध्यमातून टेक्स, ऑडीओ, व्हिडीओ माध्यमातून स्वतःची प्रतिक्रिया, अनुभव नोंदवू शकेल. यासाठी व्हाट्सअप क्रमांक ७३५०७२४३६५ हा सकाळी ८ ते सायंकाळी ७ प्रर्यंत उपलब्ध असेल. या नंबरवर केलेल्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले जाणार नाहीय. तर फेसबुक, युट्युबवर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील समाविष्ट केले जाणार आहेत.

 


Next Post
वर्क फाऊंडेशनतर्फे वाहतूक पोलिसांसोबत तंबाखूविरोधी जनजागृती

वर्क फाऊंडेशनतर्फे वाहतूक पोलिसांसोबत तंबाखूविरोधी जनजागृती

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group