• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रकाश तेली यांच्या पाणी हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन

समाजाला जलसाक्षर करण्याचा प्रयत्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 31, 2024
in जळगाव जिल्हा
0
प्रकाश तेली यांच्या पाणी हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन

जळगाव, दि.३१ – कवी, लेखक, गीतकार, व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांच्या पाणी ह्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे झाले प्रकाश तेली हे सामाजिक व संवेदनशील कवी असून त्यांनी ५००० पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून ७००० पेक्षा जास्त घोषवाक्य/स्लोगन देखील लिहिलेले आहेत.

पाणी काव्यसंग्रहात काय आहे..
पाणी काव्य संग्रहात पाण्याचे महत्व, पाणी बचतीची आवश्यकता, पाण्याचा होणारा दुरूपयोग ह्याचे मार्मिक असे विवेचन प्रकाश तेली यांनी ह्या काव्य संग्रहात केलेले असून समाजाला जलसाक्षर करण्याचा देखील अतिशय सुंदर प्रयत्न प्रकाश तेली यांनी केलेला आहे. मानवी जीवनात पाण्यास अनन्यसाधारण महत्व आहे आणि समाज ह्याकडे कसा दुर्लक्ष्य करतो यावर प्रकाश तेली यांनी उदाहरणासह प्रकाश टाकला आहे.

सजीव सृष्टीचे व देशाचे आस्तित्व हे पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करावी आणि सक्षम समाज निर्मितीच्या कार्यास हातभार लावावा आणि समस्त देशवासियांना जागृत  करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे असे प्रकाश तेली यांनी सांगीतले

मुख्य सचिव अधिकारी डाॅ. नितीन करीर यांच्या कडून प्रकाश तेली यांच्या कार्याचे कौतुक..
प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे डॉ. नितीन करीर यांनी कौतुक केले असून पाणी काव्य संग्रहाच्या कविता ह्या हृदयाला स्पर्श करणार्या व दिशादर्शक आहेत असे डॉ नितिन करीर यांनी ह्या प्रसंगी सांगीतले.

प्रकाश तेली यांचे आतापर्यंत १२ काव्य संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांनी साहित्य, कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम देखील केलेला आहे. त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली असून त्यांचे आता वीज बचती वरील काव्य संग्रहाचे काम सुरु आहे.

प्रकाश तेली पाण्यावर लवकरच गाणे बनविणार..
जलसाक्षरता जागरूकता अभियानासाठी तसेच पाण्याचे महत्त्व सहज व सोप्या भाषेत समजावे  यासाठी प्रकाश तेली पाण्यावर गीत देखील लिहिणार आहेत.प्रकाश तेली यांच्या काव्य संग्रहाचे पंतप्रधान कार्यालय, उपराष्ट्रपति कार्यालय, राज्यपाल अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्ञानपीठ व पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखक व अनेक महनीय व्यक्तीनी गौरव केला आहे.

Next Post
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण

ताज्या बातम्या

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव
गुन्हे

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

January 27, 2026
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
बालविश्व शाळेच्या चिमुकल्यांनी मानवी साखळीतून साकारले ‘वंदे मातरम्’; प्रजासत्ताक दिनी अनोखी मानवंदना
खान्देश

बालविश्व शाळेच्या चिमुकल्यांनी मानवी साखळीतून साकारले ‘वंदे मातरम्’; प्रजासत्ताक दिनी अनोखी मानवंदना

January 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group