• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद; ठिकठिकाणी जंगी स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 6, 2024
in राजकीय
0
करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली

चाळीसगाव, दि. ०६ – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर महिलांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तरुणांमध्ये एवढा उत्साह संचारला होता की, तरुणांनी चक्क करणदादा पाटील, खा. उन्मेषदादा पाटील यांना खांद्यावर घेत गावातून रॅली काढली.

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव तालुका पिंजून काढला आहे. ते त्या-त्या तालुक्यातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने गावा-गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्वतः करणदादा पाटील नागरिकांच्या भेटी घेत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

खा. उन्मेषदादा पाटील, माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या साथीने चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींना इतका अभूतपूर्व प्रतिसाद लाभला की, काही तरुण कार्यकर्त्यांनी करणदादा पाटील यांना चक्क खांद्यावर घेऊन प्रचार रॅली काढली.

Next Post
रावेरात आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ

रावेरात आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group