• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे – अशोक जैन

फाली संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा पारितोषिक वितरण सोहळा 

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 26, 2024
in कृषी
0
भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे – अशोक जैन

जळगाव, दि.२६ – ‘शेतीला भवितव्य आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे यासाठी फालीचे संम्मेलन गत दहा वर्षांपासून जैन हिल्स येथे आयोजले जाते. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेत शेती क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.

यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे संचालक डॉ. एच.पी. सिंग, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ. मोहन कुंभार, अनुप्रिया सिंग, यूपीएलचे योगेश धांडे, गणेश निकम, स्टार अॅग्रीचे सुरज पनपत्ते, निकिता शेळके, निलम मोटीयानी, अमूलचे अनिलकुमार बडाया, विक्रम जानी, महेंद्राच्या विशाखा पटोले, प्रॉम्प्टचे रितेश सुतारिया, उज्ज्वीवन स्मॉल बॅंकींगचे योगेश गुरदालकर, वैभव पाटील कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी एका विद्यार्थीनीने जैन इरिगेशनच्या कंपनीच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशोक जैन म्हणाले की, ‘तुझ्या हातून असे काम व्हावे की, फक्त पाच सात व्यक्तींचे नव्हे तर हजारोंचे पोट भरेल त्या सोबत कीडा, मुंगीचेही पोट भरेल असा काही व्यवसाय कर..हा सल्ला माझ्या वडिलांना त्यांच्या आईकडून मिळाला. एका शेतकऱ्याच्या मुलाने सुरू केलेली ही कंपनी आहे. ही कंपनी तीन पिढ्यांच्या साठवलेल्या ७ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू होऊन, आज साडेसात हजार करोड रुपयांची उलाढाल होत आहे आणि ११ हजार लोक कंपनीत काम करत आहेत. मुख्यत्वाने शेती व शेतकरी यांच्यासाठीच जैन इरिगेशनचे जगभरात कार्य सुरू आहे.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फालीचे उपक्रम भविष्यातील उपक्रम इत्यादी बाबत चर्चा केली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कंपनीच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. फाली एज्युकेटर आणि फालीला सौजन्य देणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर आभारप्रदर्शन रोहिणी घाडगे यांनी केले.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते..
ॲग्रीसेन्स: हरनेसिंग रिमोट सेन्सिंग फॉर प्रिसिजन ॲग्रीकल्चर- न्यू इंग्लिश स्कूल भालोद जि. जळगाव (प्रथम), सोरगम फिअस्ट – डॉ. आप्पासाहेब उर्फ एस. आर. पाटील उडगाव टेक्निकल हायस्कूल उडगाव ज़ि. कोल्हापूर (द्वितीय),  बायो सीएनजी – प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (तृतीय), नेचरल डाय ॲण्ड पावडर फॉर्म वालनट शेल-  आदर्श निवासी स्कूल बनासकाठा गुजरात (चौथा), मोरिंगा पावडर – सीताबाई पटवर्धन हायस्कूल कोल्हापूर (पाचवा) असे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेते..
ॲलगे पॉल्युशन बॅरिअर- सर्वोदय विद्या मंदीर प्रकाशा जि नंदुरबार (प्रथम), हायड्रेट एक्सेल ॲडव्हान्सिंग ॲग्रिकल्चरल डीहायड्रेशन- प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (द्वितीय), वॉटर स्टोअरेज फॉर्म एअर फॉग- झेड. पी. गर्ल्स हायस्कूल अमरावती (तृतीय), स्मार्ट ग्रीन हाऊस – आर. एस. माने पाटील विद्यामंदीर, विसापूर जि. सांगली (चौथा),  नट इस – हिरकणी विद्यालय गावडेवाडी जि. पुणे (पाचवा) या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण इन्होवेशन्सला पहिल्या पाचचे क्रमांक देण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर केले तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले होते. सुमारे ५८ प्रकारच्या या नावीण्यपूर्ण  इंहोव्हेशनचे परीक्षण करण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी झाल्या. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंग इत्यादी प्रकल्पांना भेट दिली. सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

फालीसाठी जैन इरिगेशनसह ज्या ज्या कंपन्यांचे सहकार्य मिळाले अशा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारच्या सत्रात फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये गट चर्चा केली. जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. सायंकाळच्या सत्रात आकाश ग्राउंडवर प्रगतशील शेतकरी डॉ. वैभव पाटील, प्रशांत राणे (कुंभारखेडे), राहूल आस्कर (वाकोद), पवन सुपडू पाटील (हातनुर), रवींद्र रामदास चौधरी (नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर. मध्यप्रदेश), भिमसिंग रामसिंग खंडाळे (वरखेड ता. चाळीसगाव), कमलाकर पाटील (बेलखेड ता. मुक्ताईनगर) या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

फालीच्या दहाव्या संम्मेलनाचा समारोपाचा तिसरा टप्पा २८ व २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.


Next Post
महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांचा शिरसोली सह ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू

महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांचा शिरसोली सह ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group