• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल

संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 24, 2024
in राजकीय
0
करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, दि. २४ – महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जळगाव मध्ये बोलताना केला. दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यातआला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून श्रीराम पाटील आणि करण पाटील या दोन उमेदवारांसह मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली.

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार श्रीराम पाटील, करण पाटील, आमदार शिरीष चौधरी, अरुणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अरुण पाटील, कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या भाजप पक्षाला पराभूत करून जागा दाखवा.. – जयंत पाटील
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दूध संघ शेतकऱ्यांना केवळ २४ रुपये लिटरचा भाव देतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ३४ ते ३५ रुपये लिटरचा भाव दुधाला मिळतो. शेतमालाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे जयंत पाटील बोलत होते.

हुकूमशाही उलथवून टाका.. – संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. दरवर्षी दीड कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करून हे सरकार सत्तेवर आले. मात्र दरवर्षी दीड लाख लोकांनाही युवकांनाही रोजगार दिला नाही. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या पक्षाला निष्ठावंतांची ताकद दाखवा व हुकूमशाही उलथून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी हितासाठी कर्जमाफी करणाऱ्या शरद पवार यांच्या पाठीमागे उभे रहा.. – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पक्षांतराचा आरोप करणाऱ्यांवर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे इतके मोठे कार्यालय इथे उभे राहिले, हा इतका पैसा कुठून आणला? असा प्रश्न विचारून शेतकरी हितासाठी कर्जमाफी करणाऱ्या शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक आता जनतेने हाती घेतली असून जनता आता विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. असे आव्हाड बोलत होते.


 

Next Post
श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन

श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन

ताज्या बातम्या

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव जिल्हा

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group