जळगाव, दि.१२ – जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर आणि डॉ.अस्मिता पाटील व तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे.
जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. यानंतर, लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर अनेकांचा पक्ष प्रवेश पार पडला.
कुणी कुणी केला पक्ष प्रवेश..
आजच्या सोहळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह अजय रंगराव देवरे, देविदास रामदास महाजन, कपिल शिवाजी देवरे, पंकज सुभाष देवरे, शेख रसूल शेख उस्मान, फिरोज पिंजारी, बशीर करीम शेख; कामरान बशीर शेख, इलियास अब्बास अली, शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख, बशीर शेख, राजू शेख, मोहन परदेशी, मोहसीन शेख, साबीर शेख, शफीक टेलर, उषा परदेशी, गायत्री पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला, शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक, नाना रामदास पाटील, प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा केशव पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले उध्दव ठाकरे..
याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून या नेत्यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळून लोकसभा निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मनोगतातून पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना डॉ.अस्मिता पाटील आणि त्यांच्या सहकार्यांमुळे मजबुती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले.