जळगाव, दि.०९ – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे गुढीपाडव्याच्या पारंपरिक सणाला सामाजिकतेचे भान देत सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे’ हे ब्रीद जपत मराठी नववर्षांरंभ दिवस साजरा करण्यात आला. ‘चिमुकल्यांच्या हस्ते पाणी बचतीचा संदेश देणारी मांगल्याची, गुढी पाणी बचतीची, अशा घोषवाक्यांनी सजवलेली गुढी नववर्षदिनी पाणी बचतीचा संकल्प राबवून मुलींच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
शाळेत शालेय वयातच मुलांना पाणी बचती सवय लागावी. तसेच सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करून एक सुजन नागरीक बनावे. त्याकरता आम्ही शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. पाण्याचे महत्व सुवर्णा अंभोरे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.