• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, अन्यथा आंदोलन उभारणार.. – मुकूंद सपकाळे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2021
in आरोग्य
0
कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, अन्यथा आंदोलन उभारणार.. – मुकूंद सपकाळे

जळगाव, दि. 12 – कोरोना महामारीत संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबाॅय, डाटाएन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक इत्यादी कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय, जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सर्व कोरोना योद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहेत.

बैठकी प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात आमदार, खासदार,मंत्री, लोकप्रतिनिधी जिवाच्या भीतीने घरी बसले असताना कोरोना रुग्णांच्या सेवा शुश्रुषा करणारे शासकीय रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडू.

संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी न्याय हक्कासाठी कोरोना योद्धयांनी संघटीतपणे आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली असून आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने या पदावर कोरोना योद्धयांना सामावून घेतले पाहिजे. यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून शासनावर दबाव टाकावा लागेल.

छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, इंजि.एच.एच.चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चंदन बिऱ्हाडे, भारत सोनवणे, सुधाकर पाटील, सतीश सुर्वे यांच्यासह कोमल बिऱ्हाडे, प्रिया वाघ, अक्षय जगताप, बापूसाहेब पाटील, कुवरसिंग पावरा, युवराज सुरवाडे, भाग्यश्री चौधरी, प्रतीक्षा सोनवणे, शिला सपकाळे, दिपाली भालेराव,‌ ऐश्र्वर्या सपकाळे, मंदाकिनी विंचूरकर, मो.आमिर शेख, निशा तापकिरे, जयवंत मराठे, जितेंद्र चौधरी, कृष्णा सावळे, सुनील परदेशी, डॉ.प्रसन्न पाटील, गणेश सोनवणे, नदीम बेग, दानिश बागवान, पवन पाटील, मनोज सावकारे, चंद्रशेखर पाटील, समाधान शिंगटे, प्रशांत नेवे, किशोर भोई यांच्यासह जिल्हाभरातील कोरोना योद्धे उपस्थित होते.

Next Post
शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडूजी सुरू

शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडूजी सुरू

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add