• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

महासंस्कृती महोत्सवाचा रविवारी झाला समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2024
in जळगाव जिल्हा
0
रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

जळगाव, दि.०४ – पाच दिवस सुरू असलेला महा संस्कृती महोत्सवाचा समारोप रविवारी सिने कलावंत सैराट फेम रिंकू राजगुरू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाला जळगावकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

खान्देश ही कलाकारांची, संताची भूमी आहे.या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करून या आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच हा महासंस्कृती महोत्सव ठेवला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवाच्या आजचा शेवटच्या समारोप दिनी आयोजित कार्यक्रमात तें बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश लोखंडे,सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या महोत्सवा मागची संकल्पना विशद केली. स्थानिक कला, दुर्मिळ कला, ऐतिहासिक शौर्य कथा, हे सादर करणारे कलाकार या सर्वांना मंच देण्याचे काम या महासंस्कृती महोत्सवाच्या मंचावरून झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

▪️रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत..
जळगाव सांस्कृतिक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची हिच्या आगमनावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिंकू राजगुरुने प्रेक्षकांशी संवाद साधताना अत्यंत महत्वाचे वाक्य बोलली, ती म्हणाली माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण शिकताना अभ्यास करायला सांगितला पण एवढीच टक्केवारी किंवा तुला हेच व्हावे लागेल हे माझ्यावर लादलं नाही म्हणून मी माझी कला जोपासू शकले. ह्या तिच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

▪️तीन बचत गटांचा गौरव..
महासंस्कृती महोत्सवातील पाचही दिवस मुक्ताई सरस प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील गायत्री बचत गट, पळसखेडे, जय जिजाऊ बचत गट,शिरोड आणि वडनगर येथील बचत गटाच्या महिलांचा प्रतिनिधीक गौरव केला.

शेवटच्या दिवशी स्थानिक कलाकारांनी अवधेय- एक आदर्श हे गीत रामायणावर आधारित नृत्य सादर केलं. त्याला प्रेक्षकांनी मोठी पसंदी दिली. आणि शेवटचा कार्यक्रम होता तें वसंत कानेटकर लिखित ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ हे नाटक. या ऐतिहासिक नाटकालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अपुर्वा वाणी यांनी महासंस्कृती महोत्सवाचे पाचही दिवस सूत्रसंचालन केले.


Next Post
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपतर्फे ‘दुचाकी रॅली’

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपतर्फे 'दुचाकी रॅली'

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group