• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर

जळगाव, दि.१० – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने डिसेंबर ३१, २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकल (Standalone) आणि एकत्रीत (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. ९ फेब्रुवारी रोजी जैन हिल्स येथे संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, संचालक डॉ. एच.पी. सिंग, डी.आर. मेहता, कंपनी सेक्रेटरी ए.व्ही. घोडगावकर यांची उपस्थिती होती.

गत नऊ महिन्यात (डिसेंबर २०२३), एकल (स्टँडअलोन) उत्पन्नात १२.६% ने वाढ झाली, तर एकत्रीत (कंसोलिडेटेड) उत्पन्नात १०.५% ची वाढ झाली आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई एकल (स्टँडअलोन EBITDA) आणि एकत्रीत (कंसोलिडेटेड EBITDA) पातळीवर अनुक्रमे १७.०% व २१.९% ने वाढला आहे. कंपनीच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास, उच्चतंत्र विभाग, प्लास्टिक विभागातील धोरणात्मक बाबी आणि किरकोळ बाजारपेठेतील भरभक्कम मागणीमुळे उल्लेखनीय विकास झाला आहे.

कंपनीकडे बुक असलेल्या ऑर्डर्स (एकल): – कंपनीच्या हाती एकूण ८५०.२ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात कृषि उच्च तंत्र उत्पादनांच्या ३२४.१ कोटी, प्लास्टिक विभागाच्या ५२६.१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश आहे. कंपनीकडे बुक असलेल्या एकत्रीत सर्व ऑर्डर्स: – कंपनीच्या हाती एकूण १९९३.० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात कृषि उच्च तंत्र उत्पादनांच्या ३२४.१ कोटी, प्लास्टिक विभागाच्या ५६३.७ कोटी रुपयांच्या आणि ११०५.२ कोटी रुपयांच्या अन्न प्रक्रिया विभागाच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

येणाऱ्या काळात सकारात्मक बदल जाणवेल..- अनिल जैन
कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले की, “ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात दुष्काळ पडल्यामुळे भारतातील कृषी व इतर संबंधित व्यवसायांवर दुष्परिणामांचा सामना करावा लागतो आहे. मागील २३-२४ आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यांमध्ये कंपनीने उत्पन्नात दुहेरी अंकात आणि कंपनीच्या सर्व विभागांच्या व्यवसायांमध्ये याहून जास्त वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (EBITDA) साध्य केली आहे. मागील तिमाही काळात ग्रामीण भागातील ऑर्डर्समध्ये (मागण्यांमध्ये) मंदीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या रोख शिलकी रकमेत घट झालेली आपल्याला दिसते कारण कापूसासारख्या पिकांच्या बाजारपेठेत किमतीत घसरण झालेली आहे. आम्हाला खात्री आहे की ही घट हंगामी आहे आणि पुढील तिमाहीमध्ये व त्याहीपुढे कंपनीच्या ऑर्डर्समध्ये जरुर वाढ होईल. रचनात्मकरित्या आम्ही योग्य दिशेला कंपनीचे धोरण नेत असून कंपनीच्या नव्या व्यवसाय आराखड्यानुसार सातत्याने वाढ व अनुकुल पत ठेवू शकू असा मला विश्वास वाटतो.”

 


 

Next Post
आ सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केला बुथ वर २५ तास प्रवास

आ सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केला बुथ वर २५ तास प्रवास

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group