लालसिंग पाटील | भडगाव, दि.09 – तालुक्यातील कजगाव येथे अनेक वर्षाची परंपरा राखत उरूस निमित्ताने या वर्षीही नेहमी प्रमाणे माजी पोलीस पाटील वसंत पाटील यांच्या घरातून पहिली उरूस चादर मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षी बैल पोळ्याला उरूस निमित्ताने जुनेगावतील माजी पोलीस पाटील यांच्या घरातून पिरबांबाच्या चादरला पहिला मान दिला जातो. यंदा कोविड नियमांचे पालन करून यंदा चादर मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.
यावेळी राजेंद्र पाटील, रहेमान शाह, राहुल राजपूत, विशाल राजपूत, धनराज महाजन, जगदीश खांडेकर, गणेश पवार, राजेंद्र राजपूत, शंकर महाजन, नारायण राजपूत, प्रशांत पवार, विजय पाटील, नाना महाजन, हर्षल पाटील, शुभम साठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.