जळगाव, दि.१९ – मानव सेवा विद्यालयातील कला शिक्षक, चित्रकार, सुनिल दाभाडे यांनी चक्क बोरांचा वापर करुन प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट साकारली आहे. अयोध्या येथे २२ जानेवारी ला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दाभाडे यांनी पोरांच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
दरम्यान ही पोट्रेट बघितल्यानंतर शबरी च्या हस्ते प्रभू श्रीराम यांनी उष्टी बोरे खाल्ली असल्याचा रामायणातील प्रसंग आठवतो. ही मोजेक पोट्रेट पेटींग २ फुट रुंदी व ४ फुट लांब असून मोजेक प्रकारातील कलाकृती आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी दाभाडे यांना साधारण २ तास लागले. यासाठी त्यांनी ४ किलो बोरांचा वापर केलायं.
चित्रकार सुनिल दाभाडे हे नेहमी काही तरी आगळावेगळा प्रयोग करत नाविण्यपूर्ण चित्र काढण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.