जळगाव, दि.०४ – संविधानिक मूल्यांची रक्षा करण्यासाठी आणि देशाचे भविष्य सुरक्षित व समृद्ध बनवण्यासाठी भारताची समृध्द विविधता व विरासत चा वारसा पुढे नेण्यासाठी जानेवारी महिन्यात जन गण मन अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी जळगावात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी प्रतिभा शिंदे, कविता कुरुंगटी, भारत जोडो आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव संजय गोपाल, सचिन धांडे आदी उपस्थित होते.
भारत जोडो अभियानाद्वारे दि. ३ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत एक ऑनलाईन आणि जमिनी स्तरावर अनेक कार्यक्रमांची एक श्रृंखला तयार केली आहे. अभियानात भारतातील सुज्ञ नागरिकांना सहभागी होण्यासाठी खान्देश स्तरीय मिस्ड कॉल नंबर ९५४९४१७४४५ जाहीर करण्यात आला आहे. भारत जोडो अभियान हा भारतातील नागरिकांचा मंच आहे. ज्यात भारतातील १५ राज्यातील अनेक संघटना सहभागी आहेत. तसेच खानदेशातील १२३ संघटना सहभागी आहेत. ह्या अभियानाचा उद्देश भारतातील सामाजिक सलोखाची रक्षा करणे, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय च्या बाबतीत आग्रही असणे त्याची आठवण उजागर करणे आणि सगळ्या नागरिकांमधील समानता आणि भाईचारासाठी प्रयत्न करणे आहे. ज्या द्वारे भारतातील लोकतांत्रिक मूल्य आणि संस्थांची रक्षा केली जावी.
जन गण मन अभियान आम्हाला विश्वास देतो की संघटित सांप्रदायिक उन्माद च्या षडयंत्राला आमची सह जीवनाची आमची उज्ज्वल व सुसंस्कृत विरसात आणि आमचे लोकतान्त्रिक, धर्मनिरपेक्ष, गणराज्य च्या संविधानिक ढाच्यावर वर हावी होवू दिले जाणार नाही. आमचा विश्वास आहे की भारताचे आम्ही लोक, भारतीय नागरिक शांती आणि सौहदर्यापूर्ण सह जीवनाची आस आहे परंतु वर्तमान परिस्थितीत त्यांना ही प्रतिबद्धता व्यक्त करण्याचे वातावरण नाही. त्यामुळे आपल्या देशाची नियती नक्की करणारे वर्ष आहे, हे अभियान देशातील सुज्ञ नागरिकांना ही संधी उपलब्ध करणे व जोडण्यासाठी चा प्रयत्न आहे. या संदर्भात रॅली, पोस्टर, बॅनर व सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून हे अभियान राबवले जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.