• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सबज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम

अभेद्य जैन, आत्मन जैन यांची स्पर्धेला उपस्थिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 1, 2024
in क्रिडा
0
सबज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम

जळगाव, दि.०१ – अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत दि.३१ डिसेंबर रोजी दोन फेऱ्या खेळवण्यात आल्या. आतापर्यंत स्पर्धेत सात फेऱ्या झाल्या असून त्यात मुलींच्या गटात आघाडीवर असलेली आणि या स्पर्धेत आपल्या नैसर्गिक गुणवत्तेची चुणूक दाखवणारी संनिद्धी भट व दिल्ली च्या साची जैन च्या रोमहर्षक मुकाबल्यात संनिद्धी ने प्रमुख दावेदार असल्याचे सिद्ध केले.

दुसऱ्या पटावर युपी ची फीडे मास्टर शूभि गुप्ता हिने अमुख्थाच्या कमकुवत राजावर हल्ला चढवत विजयश्री संपादन केली. तिसऱ्या पटावर साडेचार गुणांसह खेळणाऱ्या तमिळनाडू च्या निवेदिता ने प.बंगाल च्या स्पर्या घोष चा सहज पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले. केरळच्या अनुपमा च्या सिसिलियन ग्रँड प्रिक्स हल्ल्याला सहजी परतवून लावत मात दिली. सातव्या फेरी अखेर, मुलींच्या गटात साडे सहा गुणांसह महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर असून, तिच्याच पाठोपाठ अर्ध्या गुणांच्या फरकाने ६ गुणांसह उत्तर प्रदेश ची शुभी गुप्ता व साडे पाच गुणांसह प.बंगाल ची मृत्तिका आणि तमिळनाडू ची निवेदिता स्पर्धेमध्ये आगेचुक करत आहेत.

मुलांच्या गटात इम्रान व पारस उत्कंठावर्धक खेळ अनिर्णीत अवस्थेत निकाली निघाला तर दुसऱ्या पटावर जीहान शाह ने मयंक चक्रवती ला अंतिम स्थितीत बरोबरीत रोखले. सिसिलियन बचाव पद्धतीत खेळला डावामध्ये दिल्लीच्या दक्ष गोयल ने तेलंगणाच्या विघ्नेश ला चांगलेच कोंडीत पकडले होते. मुलांच्या गटात इम्रान ने आपली घोडदौड अशीच चालू ठेवली असून ६ गुणांसह तो स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवत असून, तब्बल ९ खेळाडू साडे पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. सामन्यागणीक स्पर्धा रंगतदार स्थितीत आली असून, या स्पर्धेचे विजेतेपद कुठला खेळाडू पटकावेल याची उत्कंठा सर्व बुद्धिबळ प्रेमींना आहे.

▪️काल दोन फेऱ्यांचा झाला खेळ…
सकाळी झालेल्या फेरीच्या सुरुवातीला महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी सर्व सहभागी खेळाडूंशी संवाद साधला, त्यात ते म्हटले की, बुद्धिबळ हे तुम्हाला विचारशील आणि संयमी व्यक्ती बनवण्यास मदत करते, त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून खेळा.
तर दुपारी झालेल्या दुसऱ्या सत्रातील फेरीसाठी अभेद्य जैन व आत्मन जैन यांची विशेष उपस्थिती लाभली, यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंना जिद्दीने आणि एकाग्रतेने खेळा व नेहमी खेळण्याचा आनंद घ्या असा कानमंत्र दिला.


Next Post
कान्ह ललित कला केंद्र जळगावची एकांकिका ‘कंदील’ची राष्ट्रीय स्तरावर निवड

कान्ह ललित कला केंद्र जळगावची एकांकिका ‘कंदील’ची राष्ट्रीय स्तरावर निवड

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group