• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2023
in कृषी
0
शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

जळगाव, दि.१४ – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचा १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यात प्रामुख्याने त्यांच्या ८६ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवाचे औपचारीक उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते तसेच माजी फलोत्पादन आयुक्त, व महासंचालक तथा पुसा युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. एच.पी. सिंग यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे व कृषि महोत्सवासाठी आलेले अंकुश गोरे यांच्यासह चौसाळा जि. बीड येथील १० शेतकरी, कंपनीचे सहकारी उपस्थित होते. हा कृषी महोत्सव १० डिसेंबर ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान साजरा होत आहे.

महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी..
या वर्षाची कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी असून केळीच्या विविध जाती, इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळीचे अतिशय देखणे प्लॉट उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षीक प्लॉट उभे आहेत.

शेतीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे, कंपनीच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावे या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गत वर्षी या उपक्रमास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी ऊसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड. फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग, ८ वेगवेगळ्या व्हरायटीचे लसूण, कांदा लागवड, अल्ट्राहायडेन्सीटीच्या फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आंतरपीक म्हणून लावलेले आले, फळबागा, केळीच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटी, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री, विविध अजारे इत्यादी शेतकऱ्यांसाठी मुख्य आकार्षण आहे. करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची केलेली लागवड शेतकऱ्यांना बघता येईल.

जैन हिल्स परिसरात भारतभरातून येणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे. येथे करण्यात येणारे संशोधन, प्रयोग, शेती समोरील नवीन नवीन विषय, आव्हाने त्याबाबत शेतकऱ्यांनी कसा सामना करावा याबाबत योजना, ते सर्व शेतकऱ्यांना जैन हिल्स येथे बघायला मिळेल. या महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय थेट जैन हिल्स येथे येऊन शेतकरी या महोत्सवात आपली नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. या महोत्सवास शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


Next Post
जळगावातील एकाला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

जळगावातील एकाला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group