• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवाहेच्छुक वधू-वर मेळाव्यात जुळले १२ विवाह, २५० तरुणांनी दिला परिचय

धनगर समाजातील सर्वशाखीय राज्यस्तरीय मेळावा उत्साहात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
विवाहेच्छुक वधू-वर मेळाव्यात जुळले १२ विवाह, २५० तरुणांनी दिला परिचय

जळगाव, दि.१० – धनगर समाजाचा २८ वा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा शहरातील अल्पबचत भवनात संपन्न झाला. मेळाव्यात २५० पेक्षा अधिक वधूवरांनी आपला परिचय करून दिला. तर १२ विवाह मेळाव्यात जुळून आले. मेळाव्याला राज्यभरातील समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

वधूवरांचे विवाह जुळविणे सोपे जाते, मात्र भविष्यात अनेक समस्या आज निर्माण होताहेत. त्यावर तोडगा निघाला नाही तर संसाराला उध्वस्त व्हायची वेळ येते. यासाठी विवाह जुळविताना विवाहेच्छुक वधू व वर यांनी एकमेकांना जाणून घेतले पाहिजे. स्वभाव, विचारांची माहिती दिली पाहिजे. म्हणजे विवाह झाल्यावर तणाव होत नाहीत, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.

मेळाव्याचे यंदाचे हे २२ वे वर्ष होते. याप्रसंगी आ. सुरेश भोळे, मल्हार सेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे, मांगल्य वधु वर केंद्राचे संचालक प्रभाकर न्हाळदे, संचालिका रेखा न्हाळदे, सेवानिवृत्त डीवायएसपी केशव पातोंड, धनगर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, जि. प. चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, उपसरपंच रामचंद्र चऱ्हाटे उपस्थित होते.

मेळाव्याला हरिभाऊ हिवराळे, शोभा मोते, नलिनी भदे, संदीप सावळे, भरत यवस्कर, गणेश जाणे, प्रमिला कंखरे, विठ्ठल बोरसे, रमेश सोनवणे, अरुण ठाकरे, नारायण निळे, गजानन निळे, डी. बी. पांढरे, चंद्रकांत ठोके, रवींद्र भालेराव, अतुल सूर्यवंशी, अशोक देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. तर आभार गणेश बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद सोनवणे, धर्मा सोनवणे, संतोष कचरे, तुळशीराम सोनवणे, पिंटू मनोरे, प्रवीण पवार, सुनील खोमणे, दिगंबर सोनवणे, मयूर ठाकरे, उमेश सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group