• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 9, 2023
in जळगाव जिल्हा
0
हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

जळगाव, दि.०९ – शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल. कृषीक्षेत्रातील जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत.

हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात गादीवाफ्यावर ठिबक संच बसवून एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड. क्रॉप कव्हरसह क्रॉपकुलिंग यंत्रणा तापमान वाढीवर नियंत्रणासाठी मिस्टर स्प्रिंकलर यंत्रणा, कापूस पिकात ठिबक मल्चिंग आणि गादीवाफाचा त्रिवेणी संगम, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळझाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावरती केलेली लागवड बघता येईल.

अवकाळीपासून केळीचे संरक्षण…
अवकाळी पाऊस, गारपीट यापासून बचाव व्हावा म्हणून शेडनेटमध्ये ग्रैन्डनैन व्हरायटी केळीची लागवड, गादीवाफा, दोन ठिबकच्या नळ्या आणि मल्चिंग असलेल्या बिगर हंगामी या केळीला पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घड पडले. बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेंट कशी करता येते हे अभ्यासता येईल. मोकळ्या शेतात ग्रॅन्डनैन बरोबरच नेंद्रन, पूवन, बंथल व रेड बनाना या जातींची लागवडही पाहता येईल.

जैन हायटेक प्लॉट फॅक्टरी टाकरखेडा येथे एरोपोनीक, हायड्रोपोनिक, भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, रोपवाटिका, दर्जेदार व रोगमुक्त रोपे कशी बनतात ते अभ्यासता येईल. परिश्रम समोर वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक व अद्यावत साधन सामुग्री व कृषी उपयुक्त अनेक गोष्टी पाहता येतील. तसेच कृषि तज्ज्ञांशी संवाद साधता येईल. कृषी महोत्सवात भेटीसाठी https://www.jains.com/farmers.meet/ या लिंकवर नोंदणी करता येईल.

Next Post
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लाडवंजारी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लाडवंजारी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add