जळगाव, दि.१८ – दरवर्षीप्रमाणे यंदाही एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने मार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणान्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणाचा सोहळा “मंगळवार दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
गणितातील प्रसिद्ध प्राध्यापक, सुपर बर्टीचे जनक पद्मश्री आनंदकुमार, पटना आणि शांतीलाल मुथ्था अध्यक्ष भारतीय जैन संघटना पुणे’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी त्यांची मुलाखत निवेदिका, मुलाखतकार मंगला खाडिलकर या घेणार असून त्याच्या प्रेरणादायी, अद्भुत आणि करिअरला नवीन दिशा देण्याचा जीवन प्रवासाचा पट प्रकट मुलाखतीद्वारे ते उलगडणार आहे.
प्रमुख अतिथी परिचय : डॉ. आनंद कुमार पटना
डॉ. आनंद कुमार एकनिष्ठ व समर्पित असे गणित या विषयाचे शिक्षक की जे “सुपर थर्टी’ या प्रणाली साठी नावाजले आहेत. डॉ. आनंद कुमार याचा जन्म एक जानेवारी १९७३ रोजी पटना (बिहार) येथे आर्थिक परिस्थितीने साधारण अशा कुटुंबात झाला, त्याचे वडील पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. आनंद कुमार यांचे शिक्षण पटना येथील हिंदी मिडीयम या सरकारी शाळेत झाले शाळेत असतानाच त्याच्यामध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली. गणित या विषयातील उच्च शिक्षण घेत असतानाच त्याचे ‘नंबर थिअरी’ मधील शोधनिबंध ‘स्पेक्ट्रम’ या अतिशय नावाजलेल्या गणित मॅगझिनमध्ये प्रकाशित झाले आहे.
१९९२ साली त्यानी गणित विषय शिकवायला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी महिना ३०० रुपये भाड्याची एक खोली घेतली तेथेच त्यांनी आपले स्वतःचे “रामानुजन स्कूल ऑफ मैथमेटिक्स’ सुरू केले. सदर संस्थेत सुरुवातीला फक्त दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले, परंतु संस्थेने उंच भरारी घेत केवळ तीन वर्षातच प्रविष्ट विद्यार्थ्यांची सख्या सुमारे ५०० पर्यंत गेली, दरम्यान ज्या गरीब विद्याध्यर्थ्यांना आय आय टी. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची होती, परंतु गरीबी मुळे ते फी भरु शकत नव्हते, असे काही विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले. गरीबी मुळे काही हुशार व होतकरू विद्यार्थी या परीक्षेपासून व शिक्षणापासून वंचित राहतात त्यांचे आयुष्य गरिबीमुळे उध्वस्त होते. आपण अशा गरीब पण हुशार होतकरू विद्याथ्यर्थ्यांसाठी काही तरी ठोस पाऊल उचलल पाहिजे असा निर्धार त्यांनी केला.
आनंद कुमार यांच्या या थोर कार्याचा सन्मान देशातील व विदेशातील अनेक संस्थानी केला. काही महत्त्वाचे पुरस्कार
• ८ नोव्हेंबर २०१८ मध्ये दुबई येथील मलबार गोल्ड अँड डायमंड द्वारा “ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड २०१८
• २०१८ मध्ये भगवान महावीर फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल “महावीर पुरस्कार”
• २०१९ – कैलिफोर्निया येथील फाउंडेशन फॉर एक्सलन्स (FFE) या संस्थेने “एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०१९
• २०२२ मध्ये “गणित रान” पुरस्कार
• २०२३ मध्ये भारत सरकारने साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदान बहल “पद्मश्री” देऊन गौरविले.
• डी आनंद कुमार यांचे कार्य व चरित्र इतके महान व उल्लेखनीय आहे की त्याची भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा दखल घेतली ह्याचे कार्य व योगदान सिनेमाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोपविले २०१९ मध्ये विभदर्शक विकास भाई यांनी सुपर थर्टी” हा चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवन व आार्यावर प्रसारित केला. या चित्रपटात आनंदकुमार याची भूमिका हृतिक रोशन या नावाजलेल्या कलाकाराने उत्कृष्ट साकारली