• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘संयम’ शिबिराच्या प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

शहरातील ७०० विद्यार्थ्यांना दिले विविध प्रशिक्षण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2023
in जळगाव जिल्हा
0
‘संयम’ शिबिराच्या प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

जळगाव, दि. ०२ – लेवा भातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे, लेवा भातृमंडळ, वारजे आणी ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘संयम’ हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. अशा सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालयामध्ये लेवा भातृ मंडळातर्फे ‘सेल्फ अवेअरनेस इन युथ फॉर अँटी अँडीक्शन् मोटीव्ह्’ अर्थात ‘संयम’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना नऊ दिवस प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये पूर्व चाचणी, पंचकोश विकसन, सौंदर्य, आरोग्य, व्यक्तिमत्व जडणघडण व नियमन, लैंगिक वर्तन, प्रसारमाध्यमांची माहिती, व्यसनाधीनता, उद्दिष्ट निश्चिती व ताणतणाव यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन, उत्तर चाचणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते.

हे मार्गदर्शन प्रशिक्षिका शुभांगी चौधरी, नीता वराडे, डॉ. ज्योती महाजन, सीमा गाजरे, संगीता पाटील, नीलिमा राणे, नीला चौधरी यांनी ७०० विद्यार्थिनींना दिले होते. यांनी निस्वार्थी व निशुल्क सेवेबद्दल सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञता सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या धांडे सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील, लेवा भातृ मंडळ, वारजेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, शानभाग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील, भादली विद्यालयाचे प्राचार्य अरविंद नारखेडे, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. जी. बावणे उपस्थित होते.

यावेळी सहभागी विद्यालय आणि प्रशिक्षकांनी प्रशिक्षण शिबिरात त्यांना आलेले अनुभव कथन केलेत. तसेच या ‘संयम’ प्रशिक्षण उपक्रमाची शृंखला इतर विद्यालयांमध्ये देखील पुढे राबविण्याचा मानस प्रशिक्षकांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षकांच्या कार्याबद्दल कौतुक करून विद्यार्थिनींना योग्य वयात जनजागृती केल्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल जावळे यांनी केले.

Next Post
ॲड. मुकुंद जाधव यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान

ॲड. मुकुंद जाधव यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add