• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 6, 2021
in सामाजिक
0
सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा

जळगाव, दि. ०६ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय परिसरात आज सर्जाराजाचा पोळा ह्या सणानिमित्‍त बैलजोडींचे पूजन करत त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बळीराजाचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. दरम्यान गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी बैलजोडीचे पूजन केले.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. जमिनीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण यंदा ६ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे साजारा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील यांनी बैलजोडीला नमस्कार करत त्यांच्यापुढे धान्याची रास खाण्यास ठेवली. डॉ.उल्हास पाटील यांनी शेतकर्‍यांना शाल, श्रीफळ, टोपी घालून सन्मानित केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, हॉर्टिकल्चरचे प्रा.सतीश सावके, प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, प्राचार्य शैलेश तायडे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके आदि उपस्थीत होते.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभात
Next Post
वानराच्या मृत्यूमुळे पोळा सण रद्द

वानराच्या मृत्यूमुळे पोळा सण रद्द

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add