• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिकेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण

५६ विभागांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवांची परिपूर्ण महिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 1, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महानगरपालिकेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण

जळगाव, दि.०१ – महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून २ ऑक्टोबर रोजी नाविन्य पुर्ण उपक्रमाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतर्फे विविध ५६ विभागांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवा जसे जन्म दाखला, मृत्यु दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि या सारख्या इतर कामांसाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कोणत्या कामासाठी कोणत्या विभागात जावे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्या कामासाठी लागणारे शासकीय शुल्क इत्यादींची माहितीपुर्ण व्हिडिओ शृंखला ‘आता मी काय करू?’चे लोकार्पण करण्यात येत आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी दिल्या शुभेच्छा..
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिकेने अशा प्रकारचे व्हिडिओ आजपर्यंत बनवले नसल्याने जळगाव मनपा या मध्ये अग्रेसर ठरणार आहे. भविष्यात हा जळगाव पॅटर्न सुद्धा ठरू शकतो. या व्हिडिओ श्रृंखलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सिने अभिनेते सुबोध भावे, विजय पाटकर, अभय कुलकर्णी आणि इतर अनेक कलाकारांनी शुभेच्छा आणि आवाहन असलेले व्हिडिओ संदेश दिले आहेत. सदर ५६ व्हिडिओज च्या शृंखले पैकी प्रथम १७ व्हिडिओ २ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरुन प्रसारित करण्यात येतील.

एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसची निर्मिती..
या व्हिडिओ ची निर्मिती एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या जळगावातील क्रिएटर्स अकॅडमी अँड स्टुडिओ या ठिकाणी चित्रित करण्यात आले असून याची संकल्पना आणि लेखन निलेश वर्मा यांचे आहे. पुणे येथील मनुश्री बिहाडे सह स्थानिक कलाकार ऋषिकेश धर्माधिकारी, उज्वला वर्मा, संदीप केदार, दीपक महाजन आदी कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे. दिग्दर्शन प्रशांत सोनवणे तर कला दिग्दर्शन हर्षदा गावडे यांनी केले आहे. मेकअप किरण अडकमोल, कॅमेरा अक्षय परांजपे, सहायक कॅमेरा ओंकार शिंदे, संकलन सुहास चोगले यांचे आहे. सदर व्हिडिओज ना जास्तीत जास्त शेअर करावे असे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी केले आहे.

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची संकल्पना..
तर दुसऱ्या उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे आवाहने आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका सर्व सोशल मीडिया माध्यमांवर JCMC Digital नावाने फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम वर आपले खाते सुरू केले आहे. तसेच पालिकेचे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल देखील सुरू करण्यात आले असून नागरिकांना व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन देखील माहिती उपलब्ध होणार आहे. सदर व्हॉट्सॲप चॅनल ची लिंक मनपा च्या सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका तज्ञ टीमची व्यवस्था करण्यात आली असून या टीम द्वारे सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. शहरातील डिजिटल मार्केटिंग कंपनी एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या सी.एस.आर ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून तीन वर्षांसाठी महापालिकेचे सोशल मीडिया खात्याचे व्यवस्थापन मोफत करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या सोशल मीडिया खात्यांना लाईक आणि फॉलो करावे असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 


Next Post
जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group