जळगाव, दि. ३० – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत ‘सेवा पखवड़’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे शहरातील मेहरूण तलावच्या ‘गणेश घाट’ इथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी देखील स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होत हातभार लावला.
यावेळी उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, अभियान प्रमुख राहुल वाघ, एडवोकेट सुचिता हाडा, दीपमाला काळे, वीरन खडके, प्रा.जीवन अत्तरदे, प्रकाश बालाणी, अजित राणे, ललित बडगुजर, जयेश भावसार, भूषण लाडवंजारी, प्रविण जाधव, संजय तिरमले, भूपेश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.