• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनी ५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनी ५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव, दि.०६ – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५१६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांसह स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ७०० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.

कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये रकतदान करण्यात आले. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३३१, फूड पार्क डिव्हाईन पार्क १४३, अलवर ०४, चित्तूर १६, बडोदा ०८, हैदराबाद १२ आणि कांताई नेत्रालय येथे ०२ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क, कांताई मंगल कार्यालय येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

जळगाव सिव्हील हॉस्पीटल आणि इंडीयन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्त संकलन केले. जैन इरिगेशनचे सहकारी मदन लाठी यांनी या शिबिरात ८५ व्या वेळा रक्तदान केले. नजिकच्या काळात १०० वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण होणार आहे.

सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कंपनीचे नाव जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. कंपनीचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या पासून सुरु झालेल्या सामाजिक कार्याला आजही तितक्याच जोमाने प्रवाहित ठेवले. त्यासाठी संपूर्ण जैन कुटुंबीय नेहमीच प्रयत्नशील असतात. रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे त्याचेच एक प्रतीक होय.

७०० जणांनी घेतला मिष्टान्नाचा लाभ..
बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधीकॉलनीतील अंध शाळा, सावखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रम त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन दिले गेले. स्नेहाच्या शिदोरीत पाकीटा ऐवजी भोजन वाढून दिले गेले होते.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक दहीहंडीचे आयोजन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक दहीहंडीचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group