• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पतंगीच्या मांजाने कापला डॉक्टरचा गळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 4, 2021
in आरोग्य
0
पतंगीच्या मांजाने कापला डॉक्टरचा गळा

 

जळगाव, दि. 04 – शहरातील सालार नगरातील रहिवाशी डॉ. जवाद अहमद आपल्या दुचाकीने जात असताना खांबाला अडकलेल्या पतंगीच्या चायना मांजामुळे त्यांचा गळा कापला गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर देखील डॉक्टर १० मिनिटे जागीच पडून होते. एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवूून त्यांना वेळीीीीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.

डॉ.अहमद हे तांबापुरा येथे जात होते. महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडकून उडत असलेला मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला. गळा कापल्यानंतर डॉ.अहमद हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते मात्र तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. दरम्यान रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉ. अहमद यांना रिक्षात टाकले आणि सारा हॉस्पिटल गाठले.

रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ.मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रीटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ.अहमद यांच्या गळ्यात १ आणि गळ्यावर ११ टाके टाकण्यात आले. डॉ.अहमद यांचा मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ.मिनाज पटेल यांनी सांगितले.

चायना मांजामुळे दरवर्षी देशभरात अनेकांचा जीव जात असतो. शासनाने या मांजावर बंदी घातली असली तरी त्याची खुलेआम विक्री केली जाते. डॉ.अहमद यांना वैद्यकीय ज्ञान असल्याने ते बचावले असले तरी इतर कुणाचा बळी जाऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
मोदींना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

मोदींना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका: महामंडळाचे आवाहन
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका: महामंडळाचे आवाहन

November 12, 2025
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त
खान्देश

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखाहून अधिक किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त

November 12, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त ‘रंगभरण’ स्पर्धा उत्साहात!

November 12, 2025
जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

November 11, 2025
गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!
खान्देश

गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!

November 11, 2025
मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ
जळगाव जिल्हा

मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ

November 10, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group