• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डोळे येण्याच्या साथीचे लक्षणे व काळजी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 25, 2023
in आरोग्य
0
डोळे येण्याच्या साथीचे लक्षणे व काळजी

जळगाव, दि.२५ – पावसाळ्याचे वातावरण हे अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच ह्या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक डोळ्यांच्या साथीचा रोग त्याचे शास्त्रीय नाव ‘कंजंक्टीवायटिस’ आहे.

ह्या साथीच्या रोगाचे कारण व निदान का?
डोळे येण्याची साथ ही मुख्यत्वे एक प्रकारच्या वायरसमुळे असते. हा आजार मुख्यत्वे वायरसच्या थेट संपर्कात आल्याने होतो. उदा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा रूमालावर हा वायरस असू शकतो. ह्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तुमच्या हातास झाला आणि तो हात तुम्ही डोळ्यांना लावला तर तुम्हाला ह्या रोगाची लागण होऊ शकते. अशा प्रकारे प्रादुर्भाव झालेले पृष्ठभाग उदा. दारांचे हँडल्स, रूमाल, टाॅवेल, काॅम्प्युटरचे माऊसच्या स्पर्शाद्वारे हा आजार पसरतो. शिवाय आजार झालेल्या व्यक्तिच्या शिंकेतून किंवा खोकल्यातूनही हा आजार पसरू शकतो.

गैरसमज-
असे मानले जाते की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात, हा गैरसमज आहे. निव्वळ बघितल्याने आजार पसरत नाही.

प्रमुख लक्षणे –
(१) डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे.
(२) डोळे लाल, गुलाबी होणे.
(३) डोळ्यांना खाज, जळजळ होणे.
(४) सकाळी झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिकटून बसणे.
(५) पापण्यांना सूज येणे, इत्यादी.

आजार झाल्यानंतर घ्यावयाची काळजी..
(१) लक्षणे दिसतच शाळेत किंवा कामावर जाणे बंद करावे.
(२) स्वतःच्या वस्तू उदा. टाॅवेल, रूमाल, उशी, इ. दुसऱ्यास वापरायला देऊ नये.
(३) घरच्या व्यक्तींच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
(४) सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
(५) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे.
(६) डोळ्यांना आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे.
(७) प्रोटेक्टीव गाॅगल लावावा.
(८) स्वतःहून काही उपचार न करता डाॅक्टरांच्या सल्यानुसारच औषधोपचार सुरू करावा.

कंजक्टीवायरिसमुळे डोळ्यात इतर कोणत्या गुंतागुंती (Complications) न झाल्यास हा आजार ५ ते ७ दिवसांत ठिक होतो. अशी माहिती जळगावच्या कांताई नेत्रालयाचे क्लिनीकल सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ.अमोल कडू यांनी दिली.

Next Post
खंडणीसाठी जळगावात गोळीबार | के.सी. पार्क परिसरात टोळक्याचा हैदोस

खंडणीसाठी जळगावात गोळीबार | के.सी. पार्क परिसरात टोळक्याचा हैदोस

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group