जळगाव, दि.१८ – भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून मंगळवारी निषेध करण्यात आला.
किरीट सोमय्या यांचे कथीत व्हिडिओ प्रकरण राज्यभरात गाजत आहे. याप्रकरणी शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे जितू साळुंके, जाकिर पठाण, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, नीलू इंगळे, विमल वाणी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.