• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2023
in शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

जळगाव, दि.०३ – अनुभूती निवासी स्कूल मध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांची सांगड घातली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य ते शिक्षण घेता यावे. काळाच्या पुढे जाऊन अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरवातीपासूनच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित या विषयाला धरून (STEM Lab) कार्यान्वित आहे. अनुभूती इनोव्हेशन सेंटर मध्ये आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि रोबोटिक लॅबची भर पडली आहे. इयत्ता ५ वी पासून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळत आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक सांकेतिक दुनियेत विद्यार्थी सक्षम होऊ पाहत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व औद्योगिक कौशल्ये विकसीत केली जावीत म्हणुन सीआयएससीई, दिल्ली बोर्डाने या वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) विषयाचा समावेश केला आहे. अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ वी पासून हा विषय अभ्यासत आहेत. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थीसुद्धा आर्टिफ़िशियल इन्टेलिजन्स क्लब मध्ये प्रात्याक्षिकासह अनुभव घेत आहेत. जेणे करून याविषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. त्याकरिता अनुभूती निवासी स्कूल व्यवस्थापनाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून अत्यंत अनुभवी शिक्षकांची नेमणूकसुद्धा केली आहे.

या अभ्यासक्रमात विद्यार्थी रोबोटिक्स, कोडिंग, थ्री डी प्रिंटींग, ड्रोन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी अशा विषयांचा सखोल अभ्यास करू शकतील. त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत संसाधनांची पुर्ततासुद्धा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी, अनुभवाधारित शिक्षणासाठी अनुभूती निवासी स्कूल कायम कटिबद्ध आहे. एवढ्या विस्तृत श्रृखंलेत विविध विषयांचे ज्ञान देणारी अनुभूती स्कूल अजून तरी अशा प्रकारची एकमेव स्कूल असल्याचे प्रतिपादन संचालिका निशा जैन यांनी केले.

Next Post
चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीच्या चित्र प्रदर्शनात निवड

चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीच्या चित्र प्रदर्शनात निवड

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add