जळगाव, दि.१२ – नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जळगाव शहरातील आदर्श नगर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. याप्रसंगी प्रभागातील नगरसेवक तसेच शिवसेना (शिंदे गटा)चे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान प्रभाग क्रमांक १३ मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन तसेच कामाच्या महिती पालकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात आरटीओ कार्यालयापासून ते उज्वल इंग्लिश मीडियम शाळेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून या कामाची अंदाजीत रक्कम १४.६९ लक्ष इतकी आहे.
याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी शहराच्या विकासासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवका ज्योती चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, ललित कोल्हे, सरीता माळी-कोल्हे, शोभा चौधरी, आशुतोष पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.