• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन

जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2021
in जळगाव जिल्हा
0
प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन

 

जळगाव, (जिमाका) दि. 1 – जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबर, 2021 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत पात्र लाभार्थीना लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकान्वे केले आहे.

भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टिने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे आणि मातमृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी, 2017 पासून कार्यान्वित केलेली आहे. राज्यातील प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा 1 जानेवारी, 2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. मात्र ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत. अशा मातांना लाभ अनुज्ञेय नाही. गरोदर व स्तनदा या अंगणवाडी कार्यकर्ती किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा आशा या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्यांना हा लाभ देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास मान्यताप्राप्त आरोग्य निदान योजनेतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत 3 टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान आधार संलग्न बॅक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBT व्दारे दिले जाते. पहिला हप्ता 1 हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होईल. दुसरा हप्ता 2 हजार रुपये किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी (ANC) केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. तिसरा हप्ता 2 हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 

Next Post
18 लाख रुपयांच्या दरोड्याचा उलगडा VIDEO

18 लाख रुपयांच्या दरोड्याचा उलगडा VIDEO

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add