जळगाव, दि. ११ – शहरातील आशाबाबानगर येथे दलीत वस्ती अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन रविवारी आमदार सुरेश भोळे (राजु मामा)यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आमदार भोळे यांनी सूचना केल्या. तसेच नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
 प्रभागात रस्त्यांची कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर आमदार भोळे यांचे आभार मानले. यावेळी रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रभागात रस्त्यांची कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर आमदार भोळे यांचे आभार मानले. यावेळी रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते.