भुसावळ, दि.03 – शहरात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करा या मागणीसाठी नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
दरम्यान जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
भुसावळ शहरातील काही गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप पूजा सूर्यवंशी यांनी केलायं. दरम्यान या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचे देखील सौ सूर्यवंशी यांनी सांगितले.
राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याचा देखील प्रश्न यावेळी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात कारवाई न केल्यास नाशिक पोलीस आयुक्तलया समोर उपोषण करणार असल्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.
पहा.. VIDEO