पारोळा, दि.०७ – तालुक्यातील पिंपळकोठे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून गावातील दात्यांनी शैक्षणिक साहित्य भेट दिले. दरम्यान विलास भीमराव पाटील यांनी त्यांच्या आई कै. सुंदरबाई भिमराव पाटील याच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक भेट दिले.
त्याचबरोबर रामकृष्ण भैय्यासाहेब पाटील, संभाजी जगतराव पाटील, दिलीप निंबा पाटील, पांडुरंग कौतिक पाटील, राकेश गोरख पाटील, दत्तू पाटील, मनीष बच्छाव, अक्षय शिवाजी पाटील आदी दात्यांनी मदतीने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षकांची मेहनत व ग्रामस्थांच्या सहकार्यतून ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावला जाऊ शकतो अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
पिंपळकोठे शाळेत डॉ.प्रदीप भदाणे यांच्या कल्पनेतून स्वखर्चाने साकारलेल्या ‘गणित प्रयोगशाळा’ प्रकल्पाची निवड राज्यातील चार शाळांमध्ये झाली होती. गणित प्रयोग शाळेतील कृतींचे व्हिडिओ चित्रीकरण नुकतेच पार पडले असून व्हिडिओ डॉक्युमेंटरी नॅशनल इन्स्टिट्यूट एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली संस्थेच्या राष्ट्रीय पोर्टलवर थोड्याच दिवसात प्रकाशित होणार आहे.
यावेळी पोलिस पाटील तापीराम पाटील, भीमराव यादवराव पाटील, भाईदास पाटील, भटू पाटील, चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, भगवान पाटील, चेतन पाटील, राहुल पाटील, आशुतोष पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप भदाणे यांनी केले मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी आभार व्यक्त केले. पी. आर. विसावे, संदीप सोनवणे, श्रीमती संगीता सोनवणे यांचे सहकार्य लाभले.