• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतले मैदानी खेळांचे प्रशिक्षण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 17, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतले मैदानी खेळांचे प्रशिक्षण

जळगाव, दि.१७ – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याची माहिती व्हावी, पारंपरिक खेळांचा प्रसार व्हावा या हेतूने ‘क्रीडा दिन’ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळून उपक्रमात उत्साह आणला. संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.

पारंपरिक मैदानी खेळ लोप पावत चालले असून, तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाइलवर गेम खेळण्याकडे मुलांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात पारंपरिक खेळाबरोबर मुले मैदानी खेळालाही विशेष प्राधान्य देत. त्यामुळे शारीरिक व्यायामदेखील होत असे. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्य ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत. त्यामुळे शाळेत मुलांना विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली खेळ शिकविण्यात आले. सागर गोट्या, कानगोष्टी, सारिपाट, नवा व्यापारी, सापशिडी यांसारखे बैठे खेळदेखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दाखविले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. बुद्धिबळ, कॅरम, खो-खो, कबड्डी या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उपक्रमात उत्साह आणला. प्रसंगी मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी मुलींना क्रीडा विकास आणि शारीरिक शिक्षण याविषयी माहिती सांगितली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर दणदणीत विजय

जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर दणदणीत विजय

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group