जळगाव, दि.१५ – शहरातील सुप्रिम कॉलनी प्रबुध्दनगरातील २४००० हजार सक्वेअर फुट परिसराच्या “नालंदा बुध्दाविहार येथे तथागत भगवान गौतमबुध्दांची ८ फुटाच्या अष्टधातुची सोन्याचा मुलामा असलेली भव्य मुर्तीची स्थापना. दि.१९ मार्च रविवार रोजी करण्यात येणार आहे.
या समारंभाप्रसंगी बौध्द धम्मगुरू पुज्यभदंत सुगतवंसजी महाथेरो, पुज्यभदंत करूनानंदजी थेरो, पुज्यभदंत ज्ञानरक्षीतजी थेरो, पुज्यमदंत धम्मबोधीजी थेरो, पुज्यभदंत संघरत्नजी थेरो, पुज्यभदंत एन. धम्मानंदजी थेरो यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणार असुन या वेळी ५-६ हजार धम्म उपासक/उपासिकांची उपस्थितीत लाभणार असल्याची माहिती मुख्य आयोजक भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर बहुउदेशिय संस्थेचे मूख्य आयोजक. अध्यक्ष संदिप शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तथागत भगवान गौतमबुध्दांची ही ८ फुटी अष्टधातुची मुर्ती असुन त्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. ही मुर्ती थायलँड येथून गगन मलीक फाउंडेशन यांच्या सहकायनि उपलब्ध झाली आहे. शहरात प्रथमच २४ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर भव्यदिव्य असे नालंदा बुध्दविहार उभारण्यात आले आहे. याठिकाणी भगवान बुध्दमुर्तीची स्थापना होत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा..
दि. १९ मार्च २०२३ रविवार रोजी सकाळी ८ ते १० वाजता बुध्दरूप मिरवणुक (धम्मरॅली) सकाळी १० ते १०:३० वाजता पु. भिक्खु संघाचे भोजनदान सकाळी १०:३० ते ११:३० वाजता धम्मध्वजारोहण, बुध्दरूपाची प्रतिस्थापना सकाळी ११:३० ते दुपारी २ वाजे पर्यंत पु. भिक्खु संघाची धम्मदेसना (धम्मसंस्कार वर्ग) आणि दुपारी २ वाजे पासून सार्वजनिक भोजनास प्रारंभ होईल.
कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, अॅड. राजेश झाल्टे, महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, अश्विन सोनवणे, ललीत कोल्हे, मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्याक्ष युवराज सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो धम्मउपासक, उपासिका यांची उपस्थिती राहणार आहे.